Share

Santosh Bangar | आमदार संतोष बांगर अडचणीत; मोक्काची कारवाई करण्याची मागणी

🕒 1 min readSantosh Bangar | पुणे : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत सापडले आहे. आता पुन्हा एकदा एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Santosh Bangar | पुणे : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत सापडले आहे. आता पुन्हा एकदा एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. सचिन खरात म्हणाले “शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते एका प्राचार्याला मारहाण करत आहे. बांगर विधीमंडळात सदस्य आहे त्यांनी कायद्याचे रक्षण करायला हवे पण रक्षण करणारेच खुलेआम कायदा तोंडात असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी” असे सचिन खरात म्हणाले आहेत.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालत असेल तर तात्काळ संतोष बांगर यांच्यावर मोक्का लावून अटक करावी” अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्य सरकारला ही मागणी करत असल्याचेही सचिन खरात म्हणाले आहे.

दरम्यान, संतोष बांगर हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात सापडतात, अधिकाऱ्यांना फोन करून अर्वाच्च भाषा वापरणे. त्यातच आता बांगर यांचा प्राचार्यांना मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि खरात यांनी केलेल्या मागणीवरुन बांगर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करुन त्यांना अटक करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!