Sanjay Raut | पुण्यातील पोटनिवडणूक लढवण्याबाबत संजय राऊत म्हणाले, “आम्ही…”

Sanjay Raut | मुंबई : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. निवडणूक लढवायची की नाही? यावर ठाकरे गटाने चर्चा केल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितली आहे.

“महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत उद्याच निर्णय होणार आहे” असेही नेते संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

“ही निवडणूक कशा प्रकारे टाळता येईल का यावरही चर्चा झाली. कारण निवडणूक लढवणारे मृत आमदारांच्या घरातील लोकं आहेत. या संदर्भातील बैठकीला उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित होते. त्यामुळे इतर सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि निवडणूक लढवावी की नाही यावर निर्णय घेऊ. निवडणूक लढायला हरकत नाही असा कालच्या बैठकीचा सूर आहे. जरी निवडणुकीतून दूर राहिलो तरी ती निवडणूक होणार आहे. काही प्रमुख अपक्ष निवडणुकीत उतरतील. त्यामुळे निवडणूक होईल”, असेही संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

“अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे काल रात्री ‘मातोश्री’वर आले होते. आम्ही या दोन पोटनिवडणुकीवर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा केली. उद्या त्यावर पुन्हा निर्णय घेऊ. निवडणूक लढलीच तर जी चिंचवडची जागा ती शिवसेनेने लढावी असं आमचं मत आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतरची जागा सेनेने लढावी असं आमचं मत आहे. कसब्याबाबत राष्ट्रवादी निर्णय होईल”, असे संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. “महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. त्याची कशी रोज पायमल्ली होतेय हे कोणी सांगायला नको. पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. मुंबईत दिसली होती”, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.