By Poll Election Pune Big Breaking | पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. 27 फेब्रवारी रोजी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक (By Poll Election) होणार होती. मात्र आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकची तारीख बदलली आहे. नवीन तारीख 26 फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात परिपत्रक काढून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने याआधी 18 जानेवारी रोजी केलेल्या घोषणेनुसार अरुणाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील काही जागांवर 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 2 मार्च रोजी मतमोजणीची तारीखही निश्चित झाली होती.
त्यानंतर महाराष्ट्रातील 12वीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याने निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता 26 फेब्रुवारी पोटनिवडणुकीची नवीन तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी 31 जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाईल. त्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 7 फेब्रुवारी असेल. 8 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 10फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
महत्वाच्या बातम्या
- Electric Car | ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
- Job Recruitment | बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Haunted Place In India | भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वात भीतीदायक, जाणून घ्या
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेअंतर्गत मिळू शकतात 8000 रुपये?
- IND vs NZ | टी-20 मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर