Share

IND vs NZ | टी-20 मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

🕒 1 min read IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली आहे. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम इंडियाने न्यूझीलंडला 386 धावांचे लक्ष … Read more

Published On: 

🕒 1 min read

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली आहे. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम इंडियाने न्यूझीलंडला 386 धावांचे लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ केवळ 295 धावा करू शकला.

एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारत न्यूझीलंडसोबत टी-20 मालिका खेळणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. अशात मालिका सुरू होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) मनगटीच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

ऋतुराज गायकवाड टीम इंडियाच्या टी-20 संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र, टी-20 मालिकेसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ऋतुराज गायकवाडच्या मनगटाला दुखापत झाली आहे. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये उपचार घेत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 8 आणि 0 धावा केल्या होत्या. या सामन्यादरम्यान फलंदाजी करताना त्याच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली होती. सध्या तो एनसीएममध्ये उपचारांसाठी गेला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 27 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्या जागी पृथ्वी शॉची निवड होऊ शकते. पृथ्वी शॉने 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Sports Cricket

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या