Sanjay Raut | “मला खोट्या प्रकरणात…”; संजय राऊतांनी सांगितलं अटकेचं कारण

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांच्या अटकेबाबत बोलत होते. यावेळी राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला अटक करण्यात आली कारण सत्तांतर करताना माझी अडचण झाली होती. महाराष्ट्रातलं चांगलं सुरू असलेलं सरकार फोडून भाजपला त्यांचं सरकार आणायचं होतं” असा गोप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.

“ते सरकार आणताना यादी केली गेली तेव्हा अडसर कोण ठरू शकतं त्याची यादी केली गेली, त्यात पहिलं नाव माझं होतं. देशाच्या गृहमंत्र्यांच्या आदेशावरून मला अटक केली गेली” असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात हा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

खोट्या प्रकरणात अटक

“महाराष्ट्रात सत्तांतर घडणार होतं, मला खोट्या प्रकरणात अटक केली. का अटक केली? शिंदे-फडणवीस सरकार बनत असताना अडथळे कुणाचे होऊ शकतात याची यादी काढली गेली. चार लोकं दिल्लीत गेले ते आज सरकारमध्ये आहेत. तिथे सांगण्यात आलं की संजय राऊतांचा बंदोबस्त करा. त्यानंतर फोन उचलला गेला आणि हे सांगण्यात आलं की संजय राऊत को अंदर डालो. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे छापा पडला आणि मला अटक झाली. आमचेही दिवस येतील पण आम्ही असं कधीही वागणार नाही. लक्षात घ्या गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय मला अटक होऊच शकत नाही. जो देशातल्या संसदेचा 20 वर्षे खासदार आहे त्याला अटक करायची असेल तर आदेश लागतोच ना? ईडीला राजकीय आदेश आला त्यामुळे अटक झाली. कारण हे सरकार स्थापन करायचं होतं. त्यांना अडथळे नको होते”. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पळून जाऊन लग्न करायचं आहे त्याला थांबवून काय फायदा?

एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं त्याला मी काही बंड वगैरे मानत नाही. त्या सगळ्या लोकांना जायचं होतं, त्यांनी मनात ठरवलं होतं. ईडीच्या केसमध्ये मला अटकच केली गेली कारण हे सत्तांतर घडवायचं होतं. पक्षात काय काय चाललं आहे हे आम्हाला माहित आहे. जे लोक सोडून गेले त्यांना जायचं होतं. आम्हाला कल्पना होती. ज्यांना पळून जाऊन लग्न करायचं आहे त्याला थांबवून काय फायदा? त्यामुळे आम्ही कुणाला थांबवलं नाही. जो मनाने आमच्यासोबत नाही त्याला कशाला थांबवायचं? राष्ट्रीय कार्यकारिणीत बसलेले लोक निघून गेले. त्यामुळे ज्यांना जायचं त्यांनी जावं ही भूमिका आम्ही घेतली, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या