Nana Patole | “जगातील सर्वात मोठ्या पक्षाला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही?”, नाना पटोलेंचा खोचक सवाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nana Patole | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसने नाशिकमधून विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. पण त्यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेसने या प्रकाराची पक्षाने दखल घेऊन दोघांनाही पक्षातून निलंबित केले. मात्र काँग्रेसमधून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “पक्षाने सत्यजित तांबे यांना दोन कोरे एबी अर्ज पाठवले होते. परंतु, तांबे यांनी ते कचऱ्याच्या पेटीत टाकले. त्याचे उत्तर संंबंधितांकडून दिले जात नाही. आपण बोललो तर अडचण होईल.” यावेळी बोलताना त्यांनी भाजपला चांगलंच सुनावलं देखील आहे.

“जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपाला नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात उमेदवार न मिळणे ही शोकांतिका आहे. या मतदारसंघात त्यांचे संघटन नाही का, पक्षाचे नाक का कापले गेले, त्यांना उमेदवार का मिळाला नाही? असे खोचक सवाल नाना पटोले यांनी भाजपला केले आहेत.

देशात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाला नाशिक मतदारसंघात उमेदवार देता आला नाही. दुसऱ्याचे घर फोडण्याचे कटकारस्थान रचून ते आनंद व्यक्त करीत आहेत. त्यांच्या पापाचा घडा जनता लवकरच फोडेल, असाही टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :