Eknath Shinde | अमित शाहांबरोबर दिल्लीत बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पार पडणार आहे.

त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी हाती येऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत  या बैठकीमागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

ते म्हणाले, “सहकार क्षेत्रात ज्या नवीन सुधारणा, योजना, साखर उद्योगात काही आपल्याला बदल आणायचे असतील, काही योजना आणायच्या असतील त्याबाबत चर्चा आहे. महाराष्ट्रसाठी काही चांगले निर्णय होतील.”

दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भाजपमधील आमदारांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यातील विस्तारात वर्णी न लागलेल्या इच्छुकांचे डोळे आता दिल्लीच्या दिशेने लागले आहेत. शिंदे गटातील आमदारांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले यांचा समावेश आहे. मंत्रिपदाचं आश्वासन मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडूही खातेवाटपाच्या प्रतिक्षेत आहेत.

भाजपमधून संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा असल्याची चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :