Hair Care With Besan | निरोगी केसांसाठी बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Care With Besan | टीम महाराष्ट्र देशा: बेसनाचा वापर चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी केला जातो. बेसनामुळे त्वचेची संबंधित अनेक समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर बेसनाच्या वापराने केसांच्या समस्या देखील दूर होऊ शकतात. होय! केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही बेसनाच्या पिठाचा वापर करू शकतात. बेसनामध्ये आढळणारे प्रोटीन केसांना पोषण प्रदान करते. बेसनाच्या मदतीने केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन हेयरमास्क लावू शकतात किंवा थेट बेसनाने ही केस धुवू शकतात. केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही पुढील प्रकारे बेसनाचा वापर करू शकतात.

बेसन आणि दही

केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही बेसन आणि दह्याचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला चार ते पाच चमचे बेसनामध्ये दही मिसळून  त्याची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून पाच मिनिटे मसाज करून पाच मिनिटांनी केस धुवावे लागेल. या मिश्रणाचा नियमित वापर केल्याने केस मजबूत होऊ शकतात.

बेसन आणि पाणी

तुम्ही बेसनामध्ये फक्त पाणी मिसळून त्याचे मिश्रण तयार करून केसांना लावू शकतात. यासाठी तुम्हाला बेसन आणि पाण्याची व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. तुम्हाला ही पेस्ट दहा ते पंधरा मिनिटे केसांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील.

बेसन आणि मध

केस धुण्यासाठी तुम्ही बेसन आणि मधाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये बेसन, मध आणि खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. तयार झालेल्या या मिश्रणाने तुम्हाला केसांना आणि टाळूला 5 मिनिट मसाज करावी लागेल. त्यानंतर दहा मिनिटे तुम्हाला हे मिश्रण डोक्यावर राहू द्यावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या वापराने केस चमकदार होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button