Indian Army Recruitment | भारतीय सैन्यात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Indian Army Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्यामध्ये शॉर्ट सर्विस कमिशनच्या (SSC) भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी अविवाहित मुलं-मुली अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

शॉर्ट सर्विस कमिशनच्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 55 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये 50 पदे NCC पुरुषांसाठी आहे, तर पाच पदे NCC महिलांसाठी आहे. भारतीय सैन्याच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून 50 टक्के गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवाराकडे एनसीसी सीनियर विभागातील दोन आणि तीन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्ष दरम्यान असावे.

भारतीय सैन्याच्या या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना सर्वप्रथम joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर स्वतःची नोंदणी करून अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर इच्छुक उमेदवारांना कागदपत्र अपलोड करावे लागेल. कागदपत्रे अपलोड झाल्यावर उमेदवाराला फॉर्म सबमिट करावा लागेल.

महत्वाच्या बातम्या

Back to top button