Chandrashekhar Bawankule | “खुर्चीसाठी उद्धव ठाकरे ओवैसींसोबतही जातील” – चंद्रशेखर बावनकुळे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

ते म्हणाले, “प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. मात्र या गोष्टीचा उद्धव ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही. कारण प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी म्हणजे भीम शक्ती नाही तो फक्त एक गट आहे.”

त्याचबरोबर खुर्ची गेल्यामुळे उद्धव ठाकरे हे अस्वस्थ झाले आहेत. सत्तेसाठी उद्या ते ओवैसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील, अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. दरम्यान, “ही युती झाली तरी ती खूप काळ टिकणार नाही, एक दिवस प्रकाश आंबेडकर कंटाळणार”, असं भाकीतही त्यांनी केलं होतं.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे युती टिकवण्याचे गुण नसल्याचे बावनकुळे म्हणालेत. जो नेता आपलं घरं, ४० आमदार सांभाळू शकत नाही तो युती काय टिकवणार? ज्या नेत्याला आपलं घर सांभाळता येत नाही तो प्रकाश आंबेडकर यांच्याशी मैत्री किती दिवस टिकवणार, मला याची शंका आहे, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या :