Job Recruitment | बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) यांच्या पुणे (Pune) येथील आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 255 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी आणि आयटी विशेषज्ञ अधिकारी पदांच्या रिक्त जागा आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांचे वय 25 ते 38 वर्ष दरम्यान असावे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.