PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेअंतर्गत मिळू शकतात 8000 रुपये?

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Sanman Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहे. सध्या शेतकरी या योजनेतील तेराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. अशात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात या योजनेतील निधीची रक्कम वाढवली जाऊ शकते. 29 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये याबद्दल माहिती देऊ शकतात. या योजनेतील तेरावा हप्ता येण्यापूर्वीच सरकार आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आठ हजार रुपयेपर्यंत लाभ देऊ शकते. कारण या योजनेमध्ये पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे या योजनेतील बजेटमध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते.

प्रधानमंत्री योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.

दरम्यान, ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी न केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्यापासून वंचित रहावे लागले होते. त्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्यांमध्ये बाराव्या हप्त्याची रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याची 2000 आणि 12 व्या हप्त्याची 2000 अशी मिळून 4000 रुपये रक्कम येणार आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button