Share

Chitra Wagh | शिवसेनेनं शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या, “घरात बसून चकाट्या पिटणाऱ्यांना…”

Chitra Wagh | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेटलेला उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद शांत झालेला असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी तो पुन्हा उकरून काढला आहे. 2020 मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिला बॉडी बिल्डरच्या गौरवप्रसंगीचा फोटा ट्विट करून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचलं आहे.

यावर चित्रा वाघ यांनी देखील ट्विट करत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी तो फोटो शरीर सौष्ठव स्पर्धेतील आहे एवढं तरी कळतं का तुम्हाला?, असं म्हणत मनिषा कायंदे यांनाच प्रतिसवाल केला आहे. त्यामुळे शांते झालेल्या वादाला आता नव्याने फोडणी मिळाली आहे.

चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनावर सवाल उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी माध्यमांबरोबरच त्यानी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.

 

त्यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला मनिषा कायंदे ताई ? खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे, असो॰कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे …?” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Chitra Wagh | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेटलेला उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद शांत झालेला असतानाच शिवसेनेच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now