Hair Care | केसांना चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच रेशमी आणि चमकदार (Soft and Silky) केस हवे असतात. स्त्री असो वा पुरुष केसांना निरोगी ठेवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यासाठी अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेली महागडी आणि रसायनयुक्त उत्पादन वापरतात. पण या रसायनयुक्त पदार्थांमुळे केसांना हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर करून काही टिप्स फॉलो केल्या पाहिजे. केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

केसांना नियमित तेल लावा

केस निरोगी ठेवण्यासाठी केसांना तेल लावणे खूप महत्त्वाचे असते. केसांना तेल लावल्याने केसांची संबंधित अनेक समस्या सहज दूर होतात. त्यामुळे नियमित केसांना तेल लावल्याच गेले पाहिजे. नियमित केसांना तेल लावल्याने कोरड्या केसांची समस्या देखील दूर होऊ शकते. त्याचबरोबर तेलाचा वापर केल्याने केस अधिक मऊ आणि चमकदार होऊ शकतात.

आहारात विटामिन्स आणि मिनरल्स समावेश करा

केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांना आतून पोषण देणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स समावेश करावा लागेल. यामध्ये तुम्ही कडधान्य, अक्रोड, पालक, टोमॅटो इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतात. या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणे केसांसाठी फायदेशीर ठरू शकते.

रसायनयुक्त उत्पादनांचा वापर टाळा

रसायनयुक्त उत्पादन वापरल्याने केसांना हानी पोहोचण्याची शक्यता अधिक निर्माण होते. यामध्ये केस तुटणे, कोरडे केस इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे. नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्याने केस चमकदार आणि मऊ राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या