Share

Devendra Fadnavis | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याने आमदारांना टेन्शन?

Devendra Fadnavis | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आत देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माध्यमांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

“अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारांवर चर्चा झाली नाही. परंतु, आम्ही योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चाच झाली नाही” असे देवेंद्र फडणवीस सांगितले आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे इच्छुक आमदारांचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती दिली नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीमध्ये भाजपचे नेते …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now