Supriya Sule | “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Supriya Sule । पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केले. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी. राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. यावर काही न बोलत त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले याचे मला आश्चर्य वाटत आहे.”

देवेंद्र फडणवीस यांचे विधान हे हास्यास्पद असल्याचं त्या म्हणाल्या. “दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या विधानावर सविस्तर बोलले आहेत. अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडत आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. नागरिकांची सुरक्षा करणे याला त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे”, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांचे आरोप काय?

“महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. महाविकास आघाडीमध्ये संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलं होतं. मात्र माझ्या विरोधात त्यांना काहीही सापडलं नाही. मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत.”

महत्वाच्या बातम्या :

Back to top button