Job Alert | इंडियन कोस्ट गार्डमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय तटरक्षक दल यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

भारतीय तटरक्षक दलामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 71 पदे भरली जाणार आहे. यामध्ये असिस्टंट कमांडंट – जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स (CPL-SSA), टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) आणि लॉ 01/2024 बॅचचे रिक्त पदे आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

भारतीय तटरक्षक दलाच्या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी भरावी लागणार आहे. इच्छुक उमेदवाराला या भरती मोहिमेसाठी 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. नेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड यांच्या सहाय्याने उमेदवार अर्ज फी भरू शकतील.

भारतीय तटरक्षक दलाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाईटला जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. त्याचबरोबर अधिक तपशिलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या