Periods Tips | महिलांनो वेळेवर मासिक पाळी येत नाही का? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Periods Tips | टीम महाराष्ट्र देशा: वेळेवर मासिक पाळी येणे हे एका स्त्रीसाठी निरोगी असण्याचे लक्षण आहे. मात्र, कधीकधी बदलती जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नियमित मासिक पाळी येण्यासाठी महिला डॉक्टरांचा सल्ला घेत असतात. परंतु, वारंवार औषधांचा वापर करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी महिला घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात. हे उपाय केल्याने मासिक पाळी वेळेवर येण्यासोबतच वेदनाही कमी होऊ शकतात. मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी महिला पुढील घरगुती उपाय करू शकतात.

ओवा

ओवा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. ओव्यामध्ये आढळणारे गुणधर्म मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम देऊ शकतात. ओव्याच्या मदतीने मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी तुम्हाला एक चमचा ओवा, गुळाचा एक छोटा तुकडा एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावा लागेल. हे पाणी उकळून अर्ध झाल्यावर कोमट करून त्याचे सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्याने मासिक पाळी वेळेवर येऊ शकते.

पपई

मासिक पाळी वेळेवर आणण्यास पपई मदत करू शकते. पपई गर्भाशयात आकुंचन उत्तेजित करते. परिणामी मासिक पाळी वेळेवर येते. त्याचबरोबर पपईमध्ये कॅरोटीन इस्ट्रोजेन हार्मोन्स आढळून येतो, जो मासिक पाळी येण्यास मदत करतो.

डाळिंबाचा रस

डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने मासिक पाळी वेळेवर येऊ शकते. मासिक पाळी तारखेच्या सुमारे पंधरा दिवस आधी डाळिंबाच्या रसाचे सेवन करणे सुरू करावे. पंधरा दिवस आधी डाळिंबाचा रस प्यायला सुरुवात केल्याने मासिक पाळी वेळेवर येऊ शकते. डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.

मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी महिला वरील घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे उपाय करूनही तुमच्या समस्याचे निवारण झाले नाही, तर डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button