Kangana Ranaut । कंगना रनौतचा ‘पठाण’ चित्रपटावर अप्रत्यक्ष निशाणा; ट्विट करत म्हणाली…

Kangana Ranaut | मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत ट्विटर अकाऊंटवर परतली आहे. ट्विटरवर परत येताच कंगनाने फिल्म इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. कंगनाने कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिचे ट्विट पाहता शाहरुख खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पठाण चित्रपटावर निशाणा साधल्याचं दिसतंय.

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी चर्चा सुरू असताना दुसरीकडे कंगनाने त्यावरून अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली आहे.

‘फिल्म इंडस्ट्री इतकी मूर्ख आहे की जेव्हा जेव्हा त्यांना एखाद्या कलेचं, निर्मितीचं किंवा प्रयत्नांचं यश दाखवायचं असतं तेव्हा ते तुमच्या चेहऱ्यावर पैशांचे आकडे फेकतात. जणू कलेचा दुसरा कोणता हेतूच नसतो. यातून त्यांचं खालच्या दर्जाचं जीवन आणि ज्याप्रकारचं वंचित आयुष्य ते जगतात ते उघड होतं,’ असं तिने ट्विटमध्ये म्हटलंय.

पुढे कंगना म्हणाली, “कलेचा जन्म मंदिरांमधून झाला आहे. त्यानंतर ही कला चित्रपटगृहांपर्यंत पोहोचली. चित्रपटसृष्टी फक्त व्यवसाय करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली नाही. फक्त कोटींमध्ये कमाई करण्यासाठी चित्रपटसृष्टी नाही. म्हणून नेहमीच कलेचा आदर केला जातो कोणत्याही व्यवसायाचा नाही.”

महत्वाच्या बातम्या :