Share

Santosh Bangar | “कोणी महिलेवर..”; व्हायरल व्हिडीओनंतर संतोष बांगर यांचा प्राचार्यांवर गंभीर आरोप

🕒 1 min read Santosh Bangar | मुंबई : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरुन अनेकांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली. मात्र … Read more

Published On: 

🕒 1 min read

Santosh Bangar | मुंबई : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरुन अनेकांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर संतोष बांगर यांनी मारहाण केल्याचे कारण स्पष्ट केले आहे.

संतोष बांगर यांचे स्पष्टीकरण

“या प्रकरणात माध्यमांनी प्राचार्य आणि उपप्राचार्यांना जाब विचारला आहे का? त्यांनी स्पष्टीकरण दिले तर, मी निश्चित कुठंतरी चुकलेलो असावे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत आहे. येथे कोणी महिलेवर अत्याचार करत असेल, तर सहन करणार नाही. मग गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही,” असे म्हणत संतोष बांगर यांनी प्राचार्यांवर गंभीर आरोप केला आहे.

“सरकारमध्ये असल्याने आवाज उठवायचा नाही का? ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण नाही आहे. संपूर्ण प्रकरणाची उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. ज्या महिलेवर अन्याय होत होता, तिचा व्हिडीओ देखील माझ्याकडे आहे. मारहाण झाल्यावर प्राचार्यांनी तक्रार का केली नाही?,” असा सवालही संतोष बांगर यांनी विचारला आहे.

नेमकं काय आहे मारहाण प्रकरण?

हिंगोलीतील तंत्रनिकेतन येथील प्राचार्यांना कार्यालयात जाऊन आमदार संतोष बांगर यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरुन अनेक नेते आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बांगर यांच्यावर टीकाही केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं. यावर आता संतोष बांगर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Maharashtra India Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या