Skin Care Tips | त्वचा स्वच्छ आणि ताजी ठेवण्यासाठी मधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेला स्वच्छ आणि ताजे ठेवण्यासाठी लोक अनेक पर्यायांचा अवलंब करतात. त्याचबरोबर चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेले महागडे आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरतात. पण या केमिकलयुक्त प्रोडक्समुळे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ करण्यासाठी हे उपाय टाळून नैसर्गिक उपाय केले पाहिजे. नैसर्गिक उपाय केल्याने चेहरा स्वच्छ आणि निरोगी राहतो. नैसर्गिक उपायांचा त्वचेवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. यासाठी तुम्ही मधाचा (Honey) वापर करू शकतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मधाचा पुढीलप्रमाणे वापर करू शकतात.

मध आणि गुलाब जल

चेहरा स्वच्छ करण्यासाठी मध आणि गुलाब जल एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एका भांड्यात दोन ते तीन चमचे मध आणि आणि गुलाब जल घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला कापसाच्या मदतीने ते चेहऱ्यावर लावावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने लावावे लागेल. या मिश्रणाचा नियमित वापर केल्याने तुमची त्वचा स्वच्छ आणि ताजी दिसायला लागेल.

मध आणि कॉफी

मध आणि कॉफीच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण साफ होऊ शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचा मधामध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने चार ते पाच मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला तो मॉइश्चराईज करावा लागेल.

मध आणि दूध

चेहऱ्यावरील डाग साफ करण्यासाठी मध आणि दुधाचे मिश्रण रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे दुधामध्ये समान प्रमाणात मध मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने लावावे लागेल. चेहरा व्यवस्थित साफ झाल्यानंतर तुम्हाला तो सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.