Chandrakant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा कोण उमेदवार असणार?; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपनेही आज पिंपरी चिंचवडमध्ये पूर्व तयारी बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून कोण उमेदवार असेल? याबाबतचे संकेत दिले आहेत.

“पिंपरी चिंचवडमधील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या प्रश्नातच उत्तर दडलं आहे. येथे लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यावरुन चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या घरातीलच एका सदस्याला उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“आमचे नेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घोषित झाली आहे. मी भाजपच्या ‘पूर्व तयारी बैठकीला आलो होतो. लक्ष्मण जगताप केवळ आमदार नव्हते. ते आमचे नेते होते. महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचा ते आधार होते. 26 फेब्रुवारीला ही पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी. पण भाजप ‘पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा परिपूर्ण विचार करा’ अशा कार्यपद्धतीची आहे. त्यामुळे गाफील न राहता या निवडणुकीच्या पूर्वतयारी बैठकीला मी आलो.

“उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक नव्हती. उमेदवार ठरवण्यासाठी भाजपची प्रक्रिया ठरलेली आहे. इच्छुकांची नावं प्रदेशाकडे जातात. प्रदेशाची एक कोअर कमिटी आहे. त्यानंतर ही नावं केंद्रीय संसदीय बोर्डाकडे जातात. त्यानंतर दिल्लीतून निर्णय घोषित होतो. ही उमेदवार ठरवणारी बैठक नव्हती,” अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या