Jitendra Awhad | मुंबई : शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याबाबत शंका होती.
अशातच काल प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान केलं. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रकाश आंबेडकरांना इशारा दिला आहे.
“महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही”, अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी.
सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 25, 2023
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
“शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं.
महत्वाच्या बातम्या :
- Prakash Ambedkar | “शरद पवार आजही भाजपसोबत”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
- Prakash Ambedkar | “आमची युती ठाकरेंशी, महाविकास आघाडीशी…”; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ
- Shivsena | “तुम्ही वडिलांसाठी काय केलं, अन् आम्ही…”; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
- BJP | “शिल्लकसेनेची युती म्हणजे ‘वंचित सोबत किंचित’”; भाजप नेत्याने शिवशक्ती-भीमशक्ती युतीची उडवली खिल्ली
- Ramdas Athawale | “ही तर शिवशक्ती आणि वंचित शक्ती”; ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंचा टोला