Share

Big Breaking | शिंदे-फडणवीसांची शपथ असंविधानिक; राजभवनकडून धक्कादायक खुलासा

🕒 1 min read Big Breaking | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र सत्तेत आलेले हे सरकार घटनाबाह्य असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यपालांनी निमंत्रण दिलेले नसतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Big Breaking | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र सत्तेत आलेले हे सरकार घटनाबाह्य असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यपालांनी निमंत्रण दिलेले नसतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी पदाची शपथ घेतली असल्याचा खुलासा राजभवनकडून देण्यात आलेल्या माहितीतून झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या कागदपत्रांची मागणी नवी मुंबईतील रहिवासी असणारे संतोष जाधव यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये राजभवनकडे केली होती.

शिंदे-फडणवीस यांना शपथ घेण्यासाठी दिलेल्या पत्राचा जावक क्रमांक आणि संबंधित जावक नोंदवहीची छायांकित प्रमाणित प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी माहितीच्या अधिकारात केली होती. मात्र राज्यपालांच्या सचिवालयाच्या जावक नोंदीमध्ये असा कोणताच तपशील उपलब्ध नसल्याचे राजभवन येतील जन माहिती अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. ही शपथच असंविधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे

दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सारवासारव करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार स्थापनेसंदर्भातील कागदपत्रे ही सर्वोच्च न्यायालयात केस सुरू असल्याने राज्यपालांच्या जवळ आहेत. राज्यपालांच्या ऑफिस जवळ नाहीत याचा अर्थ कागदपत्रे नाहीत असा होत नाही. सरकार स्थापन झाले त्यावेळी राज्यपालांनी लेखी पत्र दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या