Gopichand Padlkar | “मिरजेतील जागा आमचीच, अतिक्रमण केलं तर…”; तहसीलदारांच्या निकालानंतर पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar | सांगली : मिरजमधील वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने पाडल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) यांचे भाऊ जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे.

‘जागेवरील मिळकतधारकांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी’, असा आदेश तहसीलदार कुंभार यांनी दिला आहे. मात्र पडळकरांनी तहसीलदार कुंभार यांचा निकाल अमान्य करत त्यांनाच इशारा दिला आहे.

“निकाल माझे भाऊ ब्रह्मानंद पडळकरच्या विरोधात वगैरे काही नाही. तालुका दंडाधिकारी यांनी दिलेला अंतिम निकाल आमच्या वकिलांनी पूर्ण वाचला असून निकालात माझे भाऊ ब्रह्मानंद पडळकरच्या नावावरील प्लॉटचा कब्जा तहसीलदारांनी मान्य केला आहे, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

“आमच्या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. “ज्या 17 मिळकतधारकांनी कब्जा मिळाल्याचे सांगितलं आहे त्यांचा आणि आमच्या मिळकतीशी कोणताही संबंध नाही. तहसीलदारांनी तसाच निर्णय दिलेला आहे आणि ज्या जागेचा वाद आहे ती सिटीसर्वेनुसार आपल्याच कब्जात असल्याचाही तहसीलदारांच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले आहे” असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर म्हणाले?    

“ज्या 17 मिळकतधारकांनी जागेचा कब्जा मिळाल्याचं सांगितला आहे, त्यांच्या सिटी सर्व्हेचा नंबर हा वेगळा आहे, आणि आपल्या जागेचा नंबर वेगळा आहे” असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे. “या जागेवरून आमच्यावर ज्या लोकांनी आरोप आणि टीका केली, त्यांच्यावर आता अब्रूनुकसानीचा दावा देखील दाखल करण्यात येणार आहे. जी आमची जागा आहे, ती ताब्यात घेण्यासाठी आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारचा अतिक्रमण करू नये, यासाठी पोलीस प्रमुख असतील किंवा संबंधित प्रशासन असेल यांच्याकडे मागणी देखील करणार आहे” असे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिरज मधील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असणारी 51 गुंठे जागा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेत माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विकत घेतल्याचा दावा केला होता. या जागेवर मिळकतधारकांनी अतिक्रमण केलं असून ती काढण्यासाठी पडळकर यांनी त्यांच्या टोळीसह 4 जेसीबी घेऊन रातोरात दुकाने पाडली होती.

‘जागा माझीच असून अतिक्रमण काढण्यासाठी दुकाने पाडले’ असा दावा पडळकर यांनी केला होता. ब्रह्मानंद टोळीने घातलेल्या धुडगूसात एकूण 10 दुकानांचे सुमारे सव्वा कोटी रुपयांची नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी पडळकर यांच्यासह इतर 100 जणांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, पडळकर टोळीने घातलेल्या राड्यानंतर मिळकतधारकांकडून जागेवर प्रत्यक्ष कब्जा केला असल्याचा दावा करण्यात आला होता. झालेल्या प्रकारानंतर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार कुंभार यांनी याबाबत सुनावणी घेण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.