🕒 1 min read
ठाणे – अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्त्व द्यायचं?” असा म्हणत त्यांनी हाके आणि पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
तटकरे पुढे म्हणाले की, “हाके, पडळकर काय बोलतात त्यांना कशाला महत्व द्यायचं? त्यांच महाराष्ट्रात महत्त्व फारसं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही खात्याचा निधी वळवलेला नाही, किंवा कमी केलेला नाही. अजित पवार हे जबाबदार आणि उत्तम अर्थमंत्री म्हणून काम करत आहेत.”
Sunil Tatkare Slams Laxman Hake & Gopichand Padalkar
गोपिचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “तोल जाऊन कोण कुठे पडतं हे सगळ्यांना माहिती आहे. अशा लोकांना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही.”
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर भाष्य करताना तटकरे म्हणाले की, “सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतात. आम्ही त्यांचा निर्णय मान्य करू. एकनाथ शिंदे यांनी काय मागणी करायची तो त्यांना अधिकार आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- हार्दिक-शुभमन यांच्यात 36 चा आकडा? गिलच्या एका पोस्टने केला मोठा खुलासा, म्हणाला…
- Maharashtra Rain: राज्यात पाऊस घेणार ब्रेक, कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला
- PBKS vs MI : अहमदाबादमध्ये पावसाचं संकट! पंजाब विरुद्ध मुंबई सामना पावसामुळे रद्द होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








