🕒 1 min read
PBKS vs MI : आज आयपीएल 2025 च्या क्वालीफायर-2 सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स (PBKS vs MI) आमनेसामने भिडणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे हा थरारक सामना होणार आहे. मात्र, सामन्याआधीच आकाशात काळे ढग दाटले असून पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान कसे असेल?
दुपारी तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संध्याकाळी 6 वाजेपासून तापमानात घट होईल आणि हवेतील आर्द्रता 55 टक्क्यांपर्यंत जाईल. 7 वाजता होणाऱ्या नाणेफेकीच्या वेळेसच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये सामन्यावर परिणाम होणार की काय, याची चर्चा सुरु आहे.
Will PBKS vs MI match be cancelled due to rain?
पावसाचा खेळावर परिणाम?
पावसामुळे पिच नरम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खेळ संथ होईल आणि गोलंदाजांना फायदा मिळेल. फलंदाजांसाठी चेंडूला व्यवस्थित टायमिंग मिळवणे अवघड ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करणे फायदेशीर ठरू शकते.
सामन्याचं महत्त्व
पंजाब किंग्ससाठी हा सामना करो या मरोचा आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबने लीग स्टेजमध्ये टॉप स्थान मिळवलं, मात्र पहिल्या क्वालीफायरमध्ये पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवत इथे प्रवेश मिळवला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकाच झटक्यात राष्ट्रवादी फुटली! 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
- शरद पवारांचा मोठा खुलासा! अजित पवारांसोबत एकत्र येणार का? अखेर उत्तर दिलं
- ‘ढेकूण’ ‘देशी दारूचा ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणत सूरज चव्हाणांनी लक्ष्मण हाकेंना फटकारलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








