Share

शरद पवारांचा मोठा खुलासा! अजित पवारांसोबत एकत्र येणार का? अखेर उत्तर दिलं

Sharad Pawar says “I don’t know” when asked about reunification with Ajit Pawar’s NCP.

Published On: 

Manikrao Kokate criticized sharad pawar infront of ajit pawar

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चेचा विषय गाजतोय – दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट, म्हणजेच शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का? या पार्श्वभूमीवर शरद पवार ( Sharad Pawar ) यांना थेट विचारण्यात आले की, दोन्ही पवार कधी एकत्र येणार? यावर उत्तर देताना त्यांनी केवळ “मला माहीत नाही” असे सांगितले.

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला आणखी उधाण आलं आहे. त्यांनी एकत्र येण्याबद्दल काही सांगितलं नकारही दिला नाही. त्यामुळे त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

Will Sharad Pawar and Ajit Pawar Reunite?

यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न अनेकांना आहे. पण आतापर्यंत ही फक्त चर्चा आहे. पवार साहेब, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्याकडून याबाबत काहीही स्पष्ट झालेलं नाही. काही माहिती मिळाली तर आम्ही मीडियासमोर येऊन सांगू,” असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या सगळ्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार साहेब पूर्वेकडे जायचं असेल तर पश्चिमेकडे जातात असं म्हणतात. त्यामुळे त्यांनी ‘मला माहीत नाही’ असं जरी म्हटलं तरी प्रत्यक्षात त्यांना सगळं माहीत असतं. फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात,” असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही