Share

लक्ष्मण हाकेंनी औकात पाहून अजितदादांवर बोलावं; हाकेंच्या टीकेला अमोल मिटकरींचं जोरदार प्रत्युत्तर

Amol Mitkari hits back at Laxman Hake over derogatory remarks, says “check your worth before speaking on Ajit Pawar.

Published On: 

Amol Mitkari hits back at Laxman Hake over derogatory remarks, says “check your worth before speaking on Ajit Pawar.”

Amol Mitkari on Laxman Hake- ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी हाके यांना सुनावलं आहे. “तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट गमवावं लागतं, तरी स्वतःला ओबीसी नेते म्हणवता? अजितदादांवर बोलण्याआधी स्वतःची औकात पाहा,” असे जोरदार प्रत्युत्तर मिटकरींनी हाकेंना दिले.

ते पुढे म्हणाले, “2014 मध्ये सांगोल्यातून लढताना तू एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतलेस. तुला फक्त 527 मते मिळाली होती. तुला आतापर्यंत साडेसहा हजार मतेही मिळालेली नाहीत. मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाके तुझा खारीचा वाटा आहे. तू ओबीसीसाठी काय केलं ते जनतेला सांग? तुझ्याजवळ असलेली गाडी तू स्वतः घेतली की जनतेने दिली, हे तू खरं जनतेला सांगावं, असेही आमदार मिटकरी म्हणाले.

Amol Mitkari slams Laxman Hake for attacks on Ajit Pawar

अजित पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांनाही मिटकरींनी टोला लगावत म्हटलं, “महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखं बोलू नका. काही मिळालंय का? असं विचारलं तर वाईट वाटेल.”

शेवटी मिटकरी म्हणाले, लक्ष्मण हक्केंनी आपली औकात पहावी, नंतरच अजित पवारांवर बोलावं. हाके भूंकत राहिला तर मी त्याच्या विरोधात नक्कीच बोलेल. हाके तुझ्या अंगावर अंतर्वस्त्रही शिल्लक ठेवणार नाही. तुला तुझ्या औकातीत उत्तर दिलं जाईल.” असे मिटकरी म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही