Share

“बारामतीत येतोय, दम असेल तर आडवून दाखवा!” लक्ष्मण हाकेंचे अजित पवार गटाला थेट आव्हान

OBC leader Laxman Hake challenges NCP Ajit Pawar in Baramati: “Stop me if you can.” Slams Ajit Pawar and Suraj Chavan in fiery speech.

Published On: 

OBC leader Laxman Hake challenges NCP in Baramati: "Stop me if you can." Slams Ajit Pawar and Suraj Chavan in fiery speech.

पंढरपूर – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर थेट हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेसला उघडपणे आव्हान दिलं आहे. “मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय, दम असेल तर अडवून दाखवा,” असा थेट इशारा हाके यांनी अजित पवार गटाला दिला आहे.

पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांच्यावर टीका करत म्हटलं की, “तुमचा नेता दारू कारखान्याचा मालक आहे, मग तुझा ब्रँड कोणता ते सांग.” सुरज चव्हाण यांनी हाके यांना “देशी दारूचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर” अशी जळजळीत टीका केली होती.

Laxman Hake Slams Ajit Pawar and Suraj Chavan

हाके म्हणाले, “मी रोज दोन-तीन जिल्ह्यांच्या सीमा पार करतो. जर अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सुरज चव्हाणमध्ये दम असेल, तर आज बारामतीत येतोय, आडवा मला!”

हाके यांनी अजित पवारांवरही टीकास्त्र सोडलं. “तुमच्याकडे ना विचार आहे ना तत्त्व. सत्ता कुणाकडे असेल तिकडे तुम्ही जाताय. अशा लोकांनी विपश्यना केली पाहिजे. पहाटे-पहाटे सत्ता मिळवण्यासाठी शपथविधी करणाऱ्यांनी थोडं ध्यान करावं,” असा टोला त्यांनी लगावला.

तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही हाके यांनी टीका केली. “हे लोक मुंबईत बसून शेतकऱ्यांचे आणि ओबीसींच्या हक्कांचं लोणी खातात. यांचा नेता जसा, तसे हे लोक,” अशी जहाल प्रतिक्रिया त्यांनी दिली. हाके यांच्या या आक्रमक भाषणामुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादीकडून त्यावर काय उत्तर येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही