🕒 1 min read
क्रीडा प्रतिनिधी – IPL 2025 चा एलिमिनेटर सामना रोहित शर्माच्या नावावर ठरला! ‘हिटमॅन’ ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत गुजरात टायटन्सविरुद्ध 81 धावांची तुफानी खेळी केली आणि मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.
मुंबईने फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट्स गमावून 228 धावा केल्या. रोहित शर्माने 50 चेंडूत 81 धावा करत मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्याने आयपीएलमधील आपला 300 वा षटकार ठोकला आणि 7000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. यामुळे तो ह्या दोन्ही विक्रमांवर पोहोचणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
Rohit Sharma smashes 300th six and scores 81 runs
त्याला साथ दिली जॉनी बेअरस्टोने (22 बॉल, 47 धावा) आणि सूर्यकुमार यादवने (33 धावा). शेवटी तिलक वर्मा (25) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (नाबाद 22) यांनी मिळून धावसंख्या मजबूत केली.
प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सची सुरुवात निराशाजनक ठरली. कर्णधार शुभम गिल पहिल्याच षटकात बाद झाला. मात्र साई सुदर्शनने झुंज देत 80 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही 48 धावा करत संघाला सावरले, पण जसप्रीत बुमराह आणि रिचर्ड ग्लीसनच्या अचूक माऱ्यापुढे गुजरातला 208 धावांपर्यंतच मजल मारता आली.
या विजयानंतर मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला असून आता त्यांचा सामना पंजाबशी होणार आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा IPL 2025 मधील प्रवास संपुष्टात आला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबई इंडियन्सचा ‘हिटमॅन शो’! एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव
- मराठा आंदोलनातील गोळीबारानंतर चर्चेत आलेले तुषार दोशी पुन्हा चर्चेत – आता साताऱ्याचे एसपी!
- प्रत्येक तक्रारीची दखल घ्या!; पंकजा मुंडेंकडून महिला आयोगाला इशारा, चाकणकरांना अप्रत्यक्ष टोला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now