Share

मुंबई इंडियन्सचा ‘हिटमॅन शो’! एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव

Rohit Sharma shines with 81 runs as Mumbai Indians beat Gujarat Titans by 20 runs in IPL 2025 Eliminator. MI now face Punjab in Qualifier-2.

Published On: 

Rohit Sharma shines with 81 runs as Mumbai Indians beat Gujarat Titans by 20 runs in IPL 2025 Eliminator. MI now face Punjab in Qualifier-2.

🕒 1 min read

क्रीडा प्रतिनिधी – IPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत गुजरात टायटन्सला 20 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे मुंबईने क्वालिफायर-2 मध्ये धडक मारली असून आता त्यांचा सामना पंजाबशी होणार आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात तुफानी झाली. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने पहिल्या 6 षटकांत 79 धावा करत जीटीच्या गोलंदाजांवर ताबा मिळवला. बेअरस्टोने 22 चेंडूत 47 धावा केल्या, तर रोहितने 50 चेंडूत 81 धावांची आक्रमक खेळी करत दोन ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले — IPL मध्ये 300 षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादवने 33 धावांचे योगदान दिले, तर शेवटी तिलक वर्मा (25) आणि हार्दिक पांड्या (22*) यांनी मिळून मुंबईचा स्कोअर 228 वर नेला.

Rohit Sharma’s 81 Powers Mumbai to Beat Gujarat in IPL 2025 Eliminator

प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभम गिल पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टकडून एल्बीडब्ल्यू आऊट झाला. साई सुदर्शनने मात्र 80 धावांची दमदार खेळी करत संघाला सावरले. त्याला वॉशिंग्टन सुंदरने (48 धावा) साथ दिली. परंतु जसप्रीत बुमराह आणि रिचर्ड ग्लीसनच्या अचूक माऱ्यामुळे गुजरातचा डाव 208 धावांवर आटोपला.

या पराभवामुळे गुजरात टायटन्सचा IPL 2025 मधील प्रवास संपुष्टात आला आहे, तर मुंबई इंडियन्स अजून एका विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!