🕒 1 min read
बीड – वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात महिला आयोगाने योग्य ती भूमिका बजावली नाही, असा अप्रत्यक्ष ठपका ठेवत मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, “तक्रार कोणतीही असो, महिला आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे.”
वैष्णवी हगवणेला न्याय मिळावा यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत आहे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.
Pankaja Munde on Vaishnavi Hagavane Case
वैष्णवी हगवणे हिने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध अनेक गंभीर आरोप झाले असून पोलिसांनी अटकही केली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
वैष्णवीच्या मोठ्या जावेने स्वतःवर होणाऱ्या छळाची तक्रार महिला आयोगाकडे केली होती. मात्र, या तक्रारीवर आयोगाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य करत महिला आयोगाने ( Rupali Chakankar ) सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ध्यानात बसून काही नाही होणार! मंत्रिपद गेलेच, …जाणार! – करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
- चार कानशिलात म्हणजे छळ नाही, वकिलाच्या विधानावर महिला आयोग संतप्त, बार कौन्सिलला पत्र
- नेपाळपर्यंत पळाला पण वाचू शकला नाही! निलेश चव्हाणला पोलिसांनी ठोकल्या बेड्या