🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ( Vaishnavi Hagawane Case ) वकिलांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आरोपींचे वकील विपुल दुशिंग यांनी माध्यमांशी बोलताना, “नवऱ्याने चार कानशिलात मारल्या म्हणजे तो छळ होत नाही, तसेच वैष्णवीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू असल्याचे सांगत व्हॉट्सअॅप चॅटचा दाखला देत तिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. वकील विपुल दुशिंगयांच्या या विधानमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
या विधानामुळे राज्य महिला आयोगाने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना पत्र पाठवले असून, अधिवक्त्यांनी प्रसारमाध्यमात बोलताना जबाबदारीने आणि कायदेशीर सीमेत राहून बोलणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. आयोगाने पत्रात स्पष्ट केले आहे की, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांचे पीडितेला दोषी ठरवणारे वक्तव्य मानसिक त्रास देणारे आहे. आरोपींच्या वकिलांचे वर्तन ॲडव्होकेट्स कायदा,1961 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याचे आयोगाने पत्रात म्हटले आहे.
Vaishnavi Hagawane Case: Women’s Commission Slams Lawyer’s Comment
महिला आयोगाचे मुख्य मुद्दे:
- अधिवक्त्यांनी माध्यमांमध्ये बोलताना संवेदनशीलता राखावी.
- पीडितेच्या प्रतिष्ठा व गोपनीयतेचा आदर राखावा.
- अशा वक्तव्यांमुळे पीडित कुटुंबाचे मनोबल खच्ची होते.
- भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुस्पष्ट व नीतीसंगत नियमावली तयार करावी.
आयोगाच्या पत्रात हेही स्पष्ट केले आहे की, पुरावे फक्त न्यायालयात सादर करावेत, माध्यमांतून चारित्र्यहनन करणे हे अनैतिक आणि कायद्याच्या विरोधात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संबंधित वकिलांवर रोष व्यक्त करत “अशा वकिलांना चार कानशिलात मारणाऱ्यांचा सत्कार केला जाईल” असे म्हणाले होते, मात्र नंतर त्या वक्तव्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नेपाळपर्यंत पळाला पण वाचू शकला नाही! निलेश चव्हाणला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- वादानंतर धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय! पंकजा मुंडेंनी दिली मोठी प्रतिक्रिया
- महिला आयोगाचं सत्य बाहेर आलं! करुणा मुंडेंचा चकित करणारा मोठा खुलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








