Share

मराठा आंदोलनातील गोळीबारानंतर चर्चेत आलेले तुषार दोशी पुन्हा चर्चेत – आता साताऱ्याचे एसपी!

Tushar Doshi, linked to the Jalna firing incident, now appointed as SP Satara after transfer from Pune Railway Division.

Published On: 

Tushar Doshi, linked to the Jalna firing incident, now appointed as SP Satara after transfer from Pune Railway Division.

🕒 1 min read

सातारा: आंतरवाली सराटी (जालना) येथे मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या गोळीबार व लाठीचार्ज प्रकरणात चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी समीर शेख यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.

गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनात झालेल्या गोळीबाराचे आदेश नेमके कोणी दिले, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्या काळात दोशी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते. घटनेनंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच त्यांची पुणे सीआयडीच्या ‘क्रीम पोस्ट’वर बदली झाली, यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Tushar Doshi Appointed as Satara SP 

या प्रकरणाबाबत राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार नोंदवली होती. त्यानंतर दोशी यांची बदली पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी झाली होती.

दरम्यान, आता पोलीस दलातल्या २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये तुषार दोशी यांना साताऱ्यात नियुक्त करण्यात आले आहे. नियुक्तीच्या आदेशानंतर ते तातडीने साताऱ्यात दाखल झाले असून त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

तुषार दोशी हे २००१ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, जालना इ. ठिकाणी काम केले आहे. पुण्यात त्यांनी सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती सेवा पदक, खडतर सेवा पदक, पोलीस महासंचालक पदक, आंतरिक सुरक्षा पदक आदी सन्मान देण्यात आले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Satara Crime Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या