Share

Deepak Kesarkar | “उदय सामंत एवढे हुशार आहेत, की…”, रिफायनरी प्रकल्पावरून दीपक केसरकर यांचा खोचक टोला 

Deepak Kesarkar । कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये मतांतर असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अशातच आता माजीमंत्री आणि आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही यावर भाष्य केलं आहे. “रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का?”, हे तपासून पाहाव लागेल अस वक्तव्य त्यांनी केलं आहे. रिफायनरीच्या मुद्यावरून दिपक केसरकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही टोला … Read more

Published On: 

Deepak Kesarkar | "उदय सामंत एवढे हुशार आहेत, की...", नाणार ग्रीन रिफायनरीवरून दीपक केसरकर यांचा खोचक टोला 

Deepak Kesarkar । कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये मतांतर असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अशातच आता माजीमंत्री आणि आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही यावर भाष्य केलं आहे. “रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का?”, हे तपासून पाहाव लागेल अस वक्तव्य त्यांनी केलं आहे.

रिफायनरीच्या मुद्यावरून दिपक केसरकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावला आहे. उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पुर्ण जगभराची माहीती आहे, असं म्हणत त्यांनी उदय सामंत यांना टोला लगावला

 माझं मंत्रिपद देव ठरवत असतो

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर मी नाराज नाही असं दीपक केसरकर यांनी म्हंटल होतं. या वक्तव्याबाबत ते म्हणाले , “अनेकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, मला त्यांची कीव येते. तसंच मला जी संधी द्यायची ती साईबाबा देतील. कदाचित मी मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर जाईन.” सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कुठल्याही मंत्र्याने कामं केली नसतील एवढी कामं मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात असताना केली. मराठी भाषा विभाग, मुंबई शहर असो वा शिक्षण विभाग असो, या विभागात मी मोठी कामं केली. मी केलेल्या कामांची माहिती पुस्तिका काढणार असल्याचं ते म्हणाले. “कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ राहणार असंच काम मी या आधी केलंय आणि पुढच्या काळातही करेन,” असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही