Pushpa 2 | पुष्पा-2 या चित्रपटाच्या प्रिमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता अल्लू अर्जुन चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर अटकेचीही कारवाई करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्याची सुटका झाली.
दरम्यान, या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यावर अल्लू अर्जुनने या महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी महिलेच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत केली असल्याची माहिती समोर येतेय .
Pushpa 2 निर्माते नेमकं काय म्हणाले?
‘ही एक फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेमुळे आम्हाला फार दु:ख झालं. या महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाची फार मोठी हानी झालेली आहे. रुग्णालयात ज्या मुलावर सध्या उपचार चालू आहेत, त्याची आम्ही भेट घेतली आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहेत. आम्ही मृत महिलेच्या कुटुंबाला पूर्ण क्षमतेने मदत करू इच्छितो. त्याचा एक भाग म्हणून आम्ही ही आर्थिक मदत केली आहे, असे नवीन यरनेनी यांनी सांगितले.
अल्लू अर्जुनला (Allu Arjun) नवी नोटीस
चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा ८ वर्षांचा मुलगा जखमी असून अजूनही कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत तक्रार दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनलाही अटक करण्यात आली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्या मृत महिलेचे पती भास्कर यांनी सांगितले की, ते अभिनेत्यावरील खटला मागे घेण्यास तयार आहे. राज्य पोलिसांनी अल्लू अर्जुनला नवीन नोटीस बजावली असून त्याला आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
Pushpa 2 | पोलिसांकडून फुटेज जारी
अल्लू अर्जुनचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याला समन्स बजावण्यात आले आहेत. हैदराबाद पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी रविवारी सांगितलं की पोलीस कायदेशीर अभिप्राय घेतल्यानंतर पुढील पावलं उचलतील.
अल्लू अर्जुनने (Allu Arjun) त्याच्या विरोधातील आरोप फेटाळल्यानंतर पोलिसांनी संध्या थिएटरमधील घटनेचे मिनिटा-मिनिटाचे सीसीटीव्ही फुटेज जारी केलं. 4 डिसेंबर रोजी काय घडलं याची स्पष्ट माहिती देण्यासाठी पोलिसांनी 10 मिनिटांचा व्हिडीओ जारी केला. 1000 क्लिप्सचं विश्लेषण केल्यानंतर हा व्हिडीओ संकलित करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका