Pushpa 2 । साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करत अनेक चित्रपटांचे विक्रम मोडून काढले. हा चित्रपट एकूण 62 दिवस बॉक्स ऑफिसवर जोरदार चालला. पण एका असा चित्रपट आहे, ज्याचा विक्रम पुष्पा 2 ला मोडता आला नाही. (Pushpa 2 Box Office Collection)
दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शित 2021 च्या पुष्पा द राइजचा दुसरा भाग असलेल्या पुष्पा 2 : द रुलने देशातील सर्वात जास्त कमाई करणारा बाहुबली 2 चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 5 लाखांचा देखील गल्ला जमवता आला नाही. सॅकनिल्कच्या वेबसाइटनुसार, या चित्रपटाने 61 व्या दिवशी भारतात फक्त 3 लाखांची कमाई करत आतापर्यंत या चित्रपटाने 1233.65 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर या चित्रपटाने जगभरात सुमारे 1860 कोटी कमाई केली आहे. 58 व्या दिवशी ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाने भारतात 10 लाखांची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी घट पाहायला मिळाली.
जवान, बाहुबली 2 आणि आरआरआर यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडण्यात पुष्पा 2 यशस्वी झाला, परंतु, अभिनेता आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या दंगल (Dangal) या चित्रपटाचा विक्रम या चित्रपटाला मोडता आला नाही. दंगल चित्रपटाने जगभरात 2,070 कोटी रुपये कमावले आहेत तर पुष्पा 2 या चित्रपटाने जगभरात सुमारे 1860 कोटी कमाई केली आहे.
Pushpa 2 Collection
दरम्यान, ‘पुष्पा 2’ चित्रपटातील डायलॉगपासून ते ॲक्शन सीनपर्यंत याची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून आली. अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाचा दर्जा आणखी वाढला आहे. अशातच आता ‘पुष्पा 1: द राइज’, ‘पुष्पा 2: द रुल’ या दोन चित्रपटांनंतर लवकरच ‘पुष्पा 3: द रॅम्पेज’ (Pushpa 3: The Rampage) सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले