Share

Pushpa 2 । बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा 2’ चा धुमाकूळ! अनेक विक्रम मोडत केली तगडी कमाई

by MHD
बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' चा धुमाकूळ! अनेक विक्रम मोडत केली तगडी कमाई

Pushpa 2 । प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आतापर्यंत या सिनेमाने बक्कळ कमाई करत अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. विशेष बाब म्हणजे आजपर्यंत भारतातील कोणत्याही सिनेमाने इतकी कमाई केली नाही जितकी ‘पुष्पा 2’ ने केली आहे.

मागील चार आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसमध्ये पुष्पा 2 हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपये व्यवसाय केला. तर दुसर्‍या आठवड्यात 264.8 कोटी रुपये जमा झाले. तिसर्‍या आठवड्यात या सिनेमाने 129.5 रुपये जमा केले. तर चौथ्या शुक्रवारी 8.75 रुपये कोटीचा व्यवसाय केला. तब्बल 1700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा भारतीय सिनेमा ठरला आहे.

‘वनवास’, ‘मुफासा’ आणि ‘बेबी जॉन’ या सिनेमांना देखील पुष्पा 2 ला टक्कर देता आली नाही. अनिल शर्मा मार्गदर्शित ‘वनवास’ या सिनेमाने लाखोंचा गल्ला जमवला आणि ‘मुफासा – द लायन किंग’ यांनी मागील शनिवारी भारतीय बॉक्स ऑफिस 5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर बेबी जॉनने फक्त 25.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

कमाईबद्दल विचार करायचे झाले तर सगळ्यात अगोदर या सिनेमाने देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ला मागे टाकलं आहे. 2017 मध्ये रिलीज झालेल्या प्रभासच्या या सिनेमाने 1030.42 कोटींचा गल्ला जमवला होता. पुष्पा 2 नं यापेक्षा जवळपास 120 कोटी रुपये जास्त कमावले आहेत. तसेच पुष्पानं किंग खानलाही मागे टाकलं आहे.

महत्त्वाचे म्हणजे अभिनेता शाहरुख खानच्या दोन ब्लॉकबस्टर्स जवान (543.09 कोटी) आणि पठाण (640.25 कोटी) यांची कमाई जोडली तर, ती 1183.34 कोटी रुपये होते. पण पुष्पा 2 हा असा एकमेव सिनेमा आहे, जो एकट्या या दोन सिनेमाच्या एकूण कमाईपेक्षा जास्त कमाई करणारा ब्लॉकबस्टर ठरला आहे.

‘Pushpa 2’ has become the third Indian film to enter the 1700 crore club. If we have to think about the earnings, first of all this movie has surpassed the highest grosser of the country ‘Baahubali 2: The Conclusion’. Pushpa has also surpassed King Khan.

Maharashtra Entertainment Marathi News