Nitesh Rane | महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मंत्री आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. अशातच आता त्यांनी अजून एक विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असे त्यांनी म्हटले आहे. “राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. अतिरेकींना धरून ते खासदार झालेत” असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
पुढे ते म्हणाले , “अफजल खान वधाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला. या गोष्टीला शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून येथे उपस्थित राहिलो. स्थानिक पोलिसांनी विजय शिवतारे यांच्यापाशी मला निरोप दिला की, मी इथे प्रक्षोभक वक्तव्य करू नये.”
“आमच्या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचं रक्त भगवं आहे, ते कडवट हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे आम्हाला आता टोकाची भाषणे आणि कोणाला इशारा देण्याची गरज नाही” असं नितेश राणे म्हणाले. “आता आम्ही टोकाची भाषणे द्यायला लागलो, तर लोकच आम्हाला विचारतील तुमचे सरकार आहे, त्यामुळे आता आम्हाला असं काय करावं लागणार नाही” असं नितेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका