Walmik Karad | वाल्मिक कराडला पुण्यामध्ये घेतले ताब्यात; सीआयडी पथकाची कारवाई

walmik karad arrest

पुणे | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. हॅलो कोल्हापूर या वेबपोर्टलने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. CID च्या अधिकाऱयाने या वृत्तास दुजोरा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचेही बँक खाते गोठवण्यात आले आहे.

देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी

फरार आरोपी नंबर 1 – सुदर्शन घुले
फरार आरोपी नंबर 2 – कृष्णा आंधळे
फरार आरोपी नंबर 3 – सुधीर सांगळे

जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केलीय. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडच नाव घेतलं जातय. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.

Valmik Karad taken into custody in Pune

महत्वाच्या बातम्या

पुणे | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे.

Crime Maharashtra Marathi News Politics Pune