Bajrang Sonavane । काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता या घटनेच्या तपासासाठीच्या घडामोडींना वेग आला असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहेत. अशातच आता खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
“अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घेतलं पाहिजे कारण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सीआयडीकडे सोपवून काहीही होणार नाही”, असं खासदार बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. मागच्या अडची वर्षांच्या काळात बीडचं पालकमंत्रिपद हे धनंजय मुंडेंकडे होतं त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोपही बजरंग सोनावणेंनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुवव्यस्था पूर्वपदावर यावी. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी केली. “संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अद्याप तीन आरोपी फरारी आहेत. त्यांना पकडण्यात पोलिस दिरंगाई का करतात?”, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “अजितदादांनी लक्ष घातलं आहे तरी हत्येतील आरोपी मोकाट कसे?”; राष्ट्रवादीच्याच आमदाराचा परखड सवाल
- Santosh Deshmukh | “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून…”; आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच हळहळले
- Raj Thackeray | “त्यांनी न बोलता जे करून दाखवलं, ते अनेकांना…”; राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली!