Ajit Pawar । संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश सुरु आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. खंडणी मारामारी आणि देशमुख यांच्या निर्घृण हत्येमध्येही सर्वाधिक आरोप होत असलेला वाल्मिक कराडचं काय झालं? याबाबतही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याला शिक्षा होईल. तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बीडमध्ये निषेध मोर्चा निघणार आहे. अशातच अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अजितदादांना परखड सवाल केला आहे.
“बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे, असं सांगितलं जात आहे. जर या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे तर खंडणी आणि हत्येतील आरोपी मोकाट कसे? त्यांना अजून अटक का नाही?”, असे सवाल अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केले आहेत.
“राजाश्रय असल्याशिवाय या गोष्टी होतात का? एक आरोपी 18-18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही. खून करणाऱ्याला पकडता येत नाही. खंडणी मागणाऱ्याला पकडता येत नाही. हे काही नॉर्मल आहे का? यात कुणाचा तरी दबाव आहे, त्याशिवाय हे होणार नाही”, असे आरोप प्रकाश सोळंके यांनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh | “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून…”; आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच हळहळले
- Raj Thackeray | “त्यांनी न बोलता जे करून दाखवलं, ते अनेकांना…”; राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली!
- Dr. Manmohan Singh Death | “एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला”; शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली