Dr. Manmohan Singh Death । देशाला आर्थिक विकासाची कवाडे उलगडणारे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे आज ९२ व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी एक्सद्वारे मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला असल्याचं सांगत त्यांनी डॉ.मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
“भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो !”, अशा शब्दात शरद पवारांनी आपलं दुःख व्यक्त केलं .
महत्वाच्या बातम्या :