Share

“सत्ता सोडणार का?” प्रश्नावर अजितदादांनी थेट सुनावलं; म्हणाले, “तुम्ही का आम्हाला…?”

“वैचारिक दबाव वाढला तर सत्ता सोडणार का?” या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. “आमचं बरं चाललंय, तुम्ही का दृष्ट लावता?” असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

Published On: 

DCM Ajit Pawar slams BJP over massive corruption in PCMC, alleging funds misuse in everything from road tenders to dog sterilization. | Devendra Fadnavis

पुणे – राजकारणात सरळ प्रश्नाला ‘तिरपं’ पण तितकंच मार्मिक उत्तर कसं द्यायचं, हे अजितदादांकडून (Ajit Pawar) शिकावं. सत्तेत राहून वैचारिक कोंडी झाली तर काय करणार? असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी जे उत्तर दिलंय, त्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे. १५ जानेवारी २०२६ ला होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत दादांचा हा अंदाज सध्या जोरात व्हायरल होतोय.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा आखाडा तापला आहे. प्रचाराचा धुराळा उडत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. अजितदादांना थेट विचारलं, “वैचारिक दबाव वाढला तर तुम्ही सत्ता सोडाल का?” यावर अजितदादांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, “कशा करता वैचारिक दबाव वाढेल? आणि काय होईल? आमचं आमचं बरं चाललंय हो… तुम्ही का आम्हाला दृष्ट लावताय?” दादांच्या या एका वाक्याने विरोधकांचे आणि पत्रकारांचेही हसून हसून हाल झाले.

राज्यभर अजित पवार गट आणि शरद पवार गट (Sharad Pawar) एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र हे दोन्ही गट हातात हात घालून लढत आहेत. या ‘डबल’ भूमिकेवर बोलताना दादांचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. “पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर आम्हालाच कौल देतील. दोन्ही शहरांत आमचाच महापौर होणार,” असा दावा त्यांनी ठामपणे केला. इतकंच नाही तर, “मी काम करून दाखवलंय. मनमोहन सिंग यांनी आम्हाला ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार दिला होता,” अशी आठवणही त्यांनी (Ajit Pawar) यावेळी करून दिली.

‘तेव्हा’ जबडा तोडण्याची भाषा व्हायची!

आमच्या युतीत ७-८ पक्ष आहेत, असं स्पष्ट करताना अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. युतीमधील मतभेदांवर बोलताना ते म्हणाले, “उगीच शब्दाचा चुकीचा अर्थ काढू नका. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढायचो. केडीएमसीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र होते, तरीही एकमेकांचा ‘जबडा तोडण्याची’ भाषा करायचे.” त्यामुळे आताही सगळं काही आलबेल आहे, असाच सूर त्यांनी (Ajit Pawar) लावला.

१५ जानेवारीच्या मतदानात पुणेकर आणि पिंपरीकर दादांच्या या ‘स्मार्ट’ उत्तरावर किती विश्वास ठेवतात, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही