Share

पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – “तो १०० टक्के घोटाळाच!”

CM Devendra Fadnavis terms Parth Pawar-linked land deal a “100% scam,” hints that absence from FIR doesn’t mean clean chit.

Published On: 

CM Devendra Fadnavis terms Parth Pawar-linked land deal a "100% scam," hints that absence from FIR doesn't mean clean chit.

🕒 1 min read

मुंबई – सत्तेत एकत्र मांडीला मांडी लावून बसायचं आणि दुसरीकडे जुन्या फाइल्स उघडून ‘चेकमेट’ द्यायचा, हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं वास्तव आहे का? असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित कथित जमीन व्यवहारावर अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. “तो १०० टक्के घोटाळाच आहे,” असं स्पष्ट सांगत फडणवीसांनी सत्तेतील मित्रपक्षालाच एकप्रकारे सूचक इशारा दिला आहे.

हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अर्णब गोस्वामी (Arnab Goswami ) यांनी फडणवीसांना थेट विचारले की, पुण्यातील मुंडवा येथील १८०० कोटींच्या जमीन व्यवहारात पार्थ पवारांचं (Parth Pawar) नाव एफआयआरमध्ये (FIR) का नाही? कंपनी त्यांची आहे, फायदा त्यांना झाला, मग कारवाई का नाही?. यावर फडणवीस यांनी दिलेलं उत्तर राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं आहे.

Devendra Fadnavis on Parth Pawar Land Scam

“तो स्कॅमच आहे, कुणालाही सोडणार नाही” या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “सरकारची जमीन अशा प्रकारे विकणं आणि खरेदी करणं हा १०० टक्के स्कॅम (घोटाळा) आहे. कुणी मागणी करण्याआधीच सरकारने याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे”.

पण मग पार्थ पवारांचं नाव का वगळलं?

यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, एफआयआरमध्ये सुरुवातीला ज्यांनी कागदपत्रांवर सह्या केल्या आहेत (Signatories), त्यांची नावे येतात. या प्रकरणात पार्थ पवारांचे भाऊ (Signatory) होते, त्यामुळे त्यांचं नाव एफआयआरमध्ये आहे. जे विकणारे होते आणि ज्यांनी सह्या केल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

एफआयआरमध्ये नाव नाही म्हणून पार्थ पवार सेफ आहेत का? तर अजिबात नाही! फडणवीसांनी पुढचं वाक्य अत्यंत सावधगिरीने पण कडक शब्दांत उच्चारलं. ते म्हणाले, “एफआयआरमध्ये नाव नसणं म्हणजे तुम्ही सुटलात असा अर्थ होत नाही. खरी लढाई चार्जशीटमध्ये असते. एफआयआर हा केवळ ‘पहिली खबर’ असते. सध्या तपास अंतिम टप्प्यात आहे आणि तपासात ज्याचा ज्याचा थेट सहभाग आढळेल, त्याचं नाव चार्जशीटमध्ये येईल”.

फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सत्तेत असूनही फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तडजोड न करण्याचे संकेत दिले आहेत का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या