🕒 1 min read
मुंबई – भूक लागली की आपण पटकन मोबाईल काढतो आणि स्विगी (Swiggy) किंवा झोमॅटोवरून ऑर्डर टाकतो. पण समजा, ऑर्डर केल्यावर एका मिनिटात तुमचं मन बदललं आणि तुम्ही ऑर्डर कॅन्सल केली, तर काय होईल? फार तर ५०-६० रुपये दंड लागेल, असा तुमचा समज असेल. पण थांबा… इथे तर एका मिनिटाच्या बदल्यात संपूर्ण बिलाची रक्कम कापून घेतली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि हे कोणा सामान्य ग्राहकासोबत नाही, तर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोबत घडलंय.
Kranti Redkar Swiggy Issue
नेमकं काय घडलं?
क्रांती रेडकरने स्विगीवरून एक सँडविच ऑर्डर केलं होतं. मात्र, ऑर्डर प्लेस केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की डिलिव्हरीसाठी जवळपास एक तास लागणार आहे. जास्त वेळ वाट पाहू शकत नसल्याने तिने अवघ्या एका मिनिटाच्या आत ऑर्डर कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा तिने कॅन्सल ऑप्शन निवडला, तेव्हा ॲपवर ‘कॅन्सलेशन फी’ लागेल असा मेसेज आला. क्रांतीला वाटलं, फार तर ५०-६० रुपये फी असेल, म्हणून तिने ‘हो’ म्हटलं. पण जेव्हा मेसेज आला तेव्हा तिला धक्काच बसला! स्विगीने बिलाची १०० टक्के रक्कम (Full Amount) पेनल्टी म्हणून कापून घेतली होती.
पैसे गेले, पण जेवणही नाही!
पैसे तर गेलेच, पण मनस्ताप इथेच संपला नाही. क्रांतीने जेव्हा कस्टमर केअरशी चॅट केलं, तेव्हा त्यांनी “ही आमची पॉलिसी आहे” असं तुणतुणं वाजवलं. यावर क्रांतीने सडेतोड सवाल केला, “जर तुम्ही माझे पूर्ण पैसे कापले आहेत, तर किमान ती ऑर्डर तरी मला डिलिव्हर करा. पैसे भरलेत तर जेवण मिळायला हवं ना? मी नाही तर माझा वॉचमन तरी खाईल!”.
पण स्विगीने (Swiggy Food Delivery App) यालाही नकार दिला! “ऑर्डर कॅन्सल झालीय, त्यामुळे आम्ही जेवणही देणार नाही आणि पैसेही परत करणार नाही,” असं उत्तर तिला मिळालं. म्हणजे पैसे पूर्ण द्यायचे आणि बदल्यात हाती काहीच नाही? हा कुठला न्याय?.
“स्विगी, तू माझ्या आयुष्यातून बाद!”
या विचित्र आणि अजब कारभाराला वैतागून क्रांती रेडकरने अखेर स्विगी ॲपच अनइन्स्टॉल (Swiggy Scam) करण्याचा निर्णय घेतला आहे. “हा सरळसरळ ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार आहे,” असा संताप तिने व्यक्त केला. “पाच-दहा मिनिटं झाली असती तर समजण्यासारखं होतं, पण एका मिनिटात तुम्ही पूर्ण पैसे कसे काय जप्त करू शकता?” असा सवाल आता ती विचारत आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा फूड डिलिव्हरी ॲप्सच्या मनमानी कारभारावर (Consumer Rights) चर्चा सुरू झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- BMC Election 2026: मुंबईच्या ‘विकासा’वरून राजकारण तापलं; ‘गती’ की ‘स्थगिती’? मतदारांसमोर मोठा पेच!
- दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “आम्ही फक्त…”
- दानवेंची जीभ घसरली; भर सभेत राणे-साटम यांचा उल्लेख करत म्हणाले, “ही पिलावळ…साटम-झाटम”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











