Share

“टांगा पलटी, घोडे फरार..!”; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना ‘अल्टिमेटम’; नवी मुंबईत महायुतीतच ‘महायुद्ध’!

BJP’s Ganesh Naik warns Eknath Shinde over corruption allegations, escalating tensions within the Mahayuti alliance in Navi Mumbai.

Published On: 

BJP's Ganesh Naik warns Eknath Shinde over corruption allegations, escalating tensions within the Mahayuti alliance in Navi Mumbai.

नवी मुंबई- राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी नवी मुंबईत मात्र ‘हम साथ साथ है’ असं अजिबात दिसत नाहीये. सत्तेत एकत्र असूनही कट्टर वैऱ्यासारखे वागणाऱ्या भाजपच्या गणेश नाईकांनी आता थेट एकनाथ शिंदेंनाच (Eknath Shinde) शिंगावर घेतलंय. “मला हलक्यात घेऊ नका, नाहीतर तुमचा टांगा पलटी आणि घोडे फरार करेन,” अशा अस्सल गावरान भाषेत नाईकांनी शिंदेंना थेट ललकारल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Ganesh Naik warn Eknath Shinde

प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. “तुम्ही उन्माद करणार असाल, तर तो काढण्याची माझ्याकडे ताकद आहे,” असा सज्जड दमच गणेश नाईकांनी भरला आहे. १४ गावांच्या समावेशावरून स्थानिक आमदार आणि माजी पालकमंत्री असूनही विश्वासात न घेतल्याने नाईकांचा पारा चढलाय. “माझ्या मतदारसंघात होणाऱ्या निर्णयात मलाच विचारलं जात नसेल, तर हे खपवून घेणार नाही,” असं त्यांनी (Ganesh Naik) भर सभेत ठणकावून सांगितलं.

या राजकीय लढाईत ‘करप्शन’च्या आरोपांची जोरदार एंट्री झालीये. नवी मुंबई पालिकेची ३ हजार कोटींची फिक्स डिपॉझिट (FD) ८०० कोटींवर कशी आली? हा पैसा नक्की गेला कुठे? असे तिखट सवाल करत नाईकांनी नगरविकास खात्याकडे (जे एकनाथ शिंदेंकडे आहे) बोट दाखवलंय. इतकंच नाही तर शहराच्या विकासाचे राखीव भूखंड सिडकोने राज्य सरकारच्या परवानगीविना विकल्याचा गंभीर आरोप करत, नाईकांनी थेट या प्रकरणाच्या ईडी (ED) चौकशीची आणि स्पेशल ऑडिटची मागणी केली आहे.

शिंदेंची शिवसेना तरी हे वार शांतपणे का सहन करेल? खासदार नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske) नाईकांचा हा वार परतवून लावलाय. “स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत,” अशा आविर्भावात म्हस्केंनी नाईकांवरच बावखळेश्वर मंदिर आणि ग्लास हाऊसचे ३५० हेक्टर भूखंड लाटल्याचा आरोप केलाय. त्यामुळे नवी मुंबईत आता ‘महायुती’ नाही, तर ‘महायुद्ध’ पेटल्याचं चित्र आहे.

 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही