Share

परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न

Devendra Fadanvis | ना बीड ना नागपूर? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं?; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis vs Nana Patole | परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत असल्याचे  नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पटोले म्हणाले की, परभणीत आंबेडकरी विचाराच्या सुशिक्षित तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलीसांनी केलेली हत्याच आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या केली, या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजपा युती सरकार ते मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. देशात हुकूमशाही सुरु असून सध्या देशात काय चालले आहे हाच प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

महत्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis vs Nana Patole | परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Press Release

Join WhatsApp

Join Now