Share

Dr. Manmohan Singh । भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Dr. Manmohan Singh

Dr. Manmohan Singh । भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन (Dr Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती. यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.

मनमोहन सिंह यांचा जन्म २ ६  सप्टेंबर १ ९ ३ २  रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी १ ९ ५ ७  ते १ ९ ६ ५  या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.

मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग च्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.

महत्वाच्या बातम्या :

भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन (Dr. Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Finance Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now